मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. शनिवारी सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना होत असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात किमान पंधरा ठिकाणी पाटलांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे. त्यामुळे उद्या शक्तिप्रदर्शनरूपी स्वागतयात्रेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लागणार आहे.
#GulabraoPatil #ShivSena #EknathShinde #Jalgaon #Welcome #SanjayShirsat #Maharashtra #HWNews